Surprise Me!

रावसाहेब दानवे, राजेश टोपे एका व्यासपीठावर; खोतकर मात्र दूरच

2021-06-12 0 Dailymotion

जालना : आज जालन्यात नगरपालिकेच्या वतीने शहरातील नागरी सुविधा कामांचा उदघाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री राजेश टोपे ,आमदार कैलास गोरंटयाल यांनी प्रमुख उपस्थिती लावली. शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर मात्र कार्यक्रम पत्रिकेत नाव नसल्यानं या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले. त्यामुळे या कार्यक्रमात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजप एकत्रित आल्याचं चित्र पाहायला मिळाले.
(व्हिडिओ - लक्ष्मण सोळुंके)